सविस्तर न्युज

Click to Zoom

 

डॉ. अविनाश सुपे यांची मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख हॉस्पिटलचे संचालक म्हणून नियुक्ती

 

 

( प्रतिनिधी - सुनील भोळे, मुंबई ) 

 

               के.ई.एम. हॉस्पिटलचे डीन डॉ. अविनाश सुपे यांची मुंबई महानगरपालिकेच्या वैद्यकीय शिक्षण व प्रमुख हॉस्पिटलचे संचालक म्हणून नियुक्ती झाली आहे. डॉ. सुपे हे १९८३ पासून वैद्यकीय शिक्षण विभागात कार्यरत आहेत. त्यांनी महापालिकेच्या के.ई.एम. हॉस्पिटल व सेठ जी.एस.मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे. ते यापूर्वी सायन हॉस्पिटल चे डीन म्हणून देखील कार्यरत होते. डॉ. सुपे यांना राष्ट्रीय व अंतराष्ट्रीय २६ पुरस्कार मिळालेले आहे.