सविस्तर न्युज

Click to Zoom
Click to Zoom

 

लेवा पाटीदार बहुउद्देशीय विकास संस्था, नाशिक. यांच्या मार्फत गरीब विद्यार्थ्यांना करण्यात आले शालेय साहित्यांचे वाटप.
 

 

( प्रतिनिधी  - सुहास कोल्हे नाशिक ) 

 

            नाशिक जिल्ह्यातील नांगलवाडी हे गाव, तसे हे गाव अगदी छोटंसं परंतु विश्वकोशात नावाजलेलं. या गावाला " आदर्श गाव " म्हणून सुद्धा राज्य सरकारने गौरविले आहे. तसेच हे गाव तंटा मुक्ती आहे. या गावात कोणताही राजकीय पक्ष नाही येथे सर्व निवडणूका संगनमताने बिनविरोध होतात. या गावाला राज्यपालांसह अनेक मान्यवर व्यक्तींनी भेटी दिलेल्या आहे. हे गाव प्रकल्प ग्रस्त म्हणून ओळखले जाते. या गावातील सर्व गावकऱ्यांच्या जमिनी नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणामध्ये गेलेल्या आहे. या गावामध्ये प्रामुख्याने मजूर वर्ग आहे. त्यांना नेहमीच त्यांच्या उदरनिर्वाहासह मुलांच्या शिक्षणाची चिंता असते. परंतु सत्कर्म करणारे अनेक दात्यांचे हात त्यांच्या जवळ जाऊन पोहचतात व त्यांना शैक्षणिक मदतीसह शक्य होईल ती मदत करीत असतात. या मदतीत अजून भर पडली ती नाशिक येथील लेवा पाटीदार बहुउद्देशीय विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची.

              या पदाधिकाऱ्यांनी स्वखर्चाने आपल्या संस्थेच्या नावाने प्रत्यक्ष नांगलवाडी येथील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप केले. याप्रसंगी शाळेचे केंद्र प्रमुख तसेच गावाचे सरपंच व ग्रामस्थांनी उपस्थिती दर्शविली होती. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. संदीप येवले ( समाजसेवक ), उपाध्यक्ष श्री. मोहन पाटील ( उद्योजक ), श्री नामदेव पाटील ( उद्योजक ), सचिव श्री. सुहास कोल्हे ( समाजसेवक ), खजिनदार श्री. राजेंद्र फेगडे ( बांधकाम व्यावसायिक ), प्रवक्ता प्रा. जानकीराम कोल्हे, सर्व संचालक श्री. प्रशांत चौधरी ( उद्योजक ), श्री. विरेंद्र झोपे ( उद्योजक ), डॉ. रोटे, अ‍ॅड वंदनाताई नेहेते, कवयित्री सौ. प्रतिभाताई चौधरी, सौ. माधुरीताई पाटिल, श्री. संदीप धांडे ( उदयोजक ), सौ रुपालीताई भोळे, श्री आशिष चौधरी ( बांधकाम व्यावसायिक ), श्री. संजय नारखेडे ( उद्योजक ) यांनी प्रयत्न केले तर त्यांना अनमोल सहकार्य लाभेल ते श्री. राजू चौधरी, श्री. खेमचंद्र भोळे, सौ. अर्चनाताई नेहेते, श्री. नीरज नारखेडे, श्री. किरण चौधरी, श्री.प्रितम कोलते, श्री.दिपक इंगळे, श्री. कमलाकर सरोदे यांचे. या संस्थेने राबविलेला हा उपक्रम खरोखर कौतुकास्पद आहे.

Click to Zoom

Click to Zoom