सविस्तर न्युज

Click to Zoom
Click to Zoom


अमेरिकेत साकारले जाणार लेवा पाटीदार समाजाचे भवन

 

( प्रतिनिधी - श्री. योगेश खाचने, बंगलोर )

 

              समाजसेवा म्हटली तर माणूस वाटेल त्या स्थितीत असला तरी तो करू शकतो. त्या करता लागते ती मनस्वी समाज सेवेचि आवड, समाजाविषयी अभिमान.

              .....आणि असाच आपल्या समजाविषयी म्हणजेच लेवा समाजा विषयी अभिमान बळगलाय त्या चार समाज धुरीणांनी की, जे कित्येक वर्षांपासून साता समुद्रापार असलेल्या अमेरिकेतील न्यूजर्सी राज्यातील एडिसन शहरात स्थायिक आहेत. त्यांचे हे समाज प्रेम थोड़े सुध्दा कमी झालेले नाही. त्यांचे नाव आहेत श्री. अशोक चौधरी, श्री. चंद्रकांत खाचने, श्री. प्रमोद अत्तरदे आणि श्री. राजेश इंगळे.

              हे समाज बंधू दरवर्षी आपल्या परिसरातील तसेच आजुबांजूच्या राज्यातील समाजबांधवांना एकत्रित करतात आणि खास खांदेशी विशेषतः लेवा समाजातील पारंपारीक भोजनाचा आंनद लुटतात व समाजा विषयी चर्चासत्राचे आयोजन करतात, समाज प्रबोधन करतात. सालाबादा प्रमाणे या समाजबंधूंनी याही वर्षी अश्या मेजवानीचे आयोजन केले होते ते दिनांक 03/ 07 / 2010 या तारखेला.

              या छोटे खानीला अमेरिकेतील जवळ जवळ 220 समाजबांधवांनी उपस्थिति दर्शविलि, जेवणाचा आंनद घेतला, समाजा विषयी चिंतन केले आणि त्यातून निर्णय घेतला की अमेरिकेत आपल्या समाजाचे एक छान भवन उभारावे की जेनेकरुण होतकरुंना ते उपयुक्त ठरेल. या छोटेखानी मध्ये या बांधवांनी या वर्षी वांग्याची भाजी, मठ्ठा, बटाटा वडा, वरण बट्टी इत्यादि चटपटीत खान्देशी पदार्थांची नेमणूक केलेली होती. विशेषतः या कार्यक्रमाच्या आयोनाला या चारही बंधूंच्या परिवाराचा विशेष सहभाग असतो.

              अभिमान वाटतो अश्या समाज बांधवांचा........

Click to Zoom

Click to Zoom