लेवा पाटीदार बंधू-भगिनींनो सुस्वागतम...

           आपल्या सर्वांना जोडणारा एकमेव धागा म्हणजे आपला समाज. अहो...सर्व जग ज्यांच्या कर्मठतेला, शिक्षणाच्या आसक्तीला, कठोर परिश्रमाला, प्रगतीशील विचारांना, नव्याचा वेध घेणार्‍या लवचिकतेला आणि सातत्याने कार्यमग्नतेची वाखाणणी करते त्या लेवा पाटीदार समाजात तुम्ही-आम्ही जन्मलो याहून मोठी पुण्याई आणखी दुसरी कोणती असणार? हो...अल्पसंख्य आणि अगदी मुठभर असलो तरी जगात आपल्या बांधवांनी विविध क्षेत्रांमध्ये नेत्रदीपक यश मिळवले आहे. गगनाला गवसणी घातली तरी मातीचे उपकार कधी आपण विसरले नाहीत. असे कोणते क्षेत्र आहे जेथे लेवा नाही? अगदी समर्पक शब्दांत बोलायचे तर ‘जिथे हवा...तिथे लेवा’ असा आपला लौकीक आहे. मात्र आपल्या सर्वांना जोडणारा समान दुवा संपुर्ण जगात कुठेही नसल्याची खंत आपणा सर्वांच्या मनात अवश्यक आहे. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन ‘लेवा पाटीदार समाज.कॉम’च्या माध्यमातून आम्ही आपल्या सेवेत हजर आहोत.
           आपण सर्व विविध क्षेत्रात अग्रेसर आहोत. मात्र समस्त कर्तबगार समाजबांधवांची माहिती एकाच ठिकाणी देऊन त्यांच्या कार्याला आपण सलाम तर करणारच आहोत पण यातून नव्या पिढीला यापासून प्रेरणा मिळावी हादेखील आमचा मुळ हेतू आहे. यासोबत विचारांचे आदान-प्रदान करण्यासाठी हे एकविसाव्या शतकाला साजेसे हायटेक व्यासपीठ आहे. समाजाची परंपरा जोपासत नव्या युगाशी सुर मिळवण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्या सहकार्याशिवाय अपुर्ण असल्याची नम्र भावना आमच्या अंगी आहे. यामुळे सोबत या...विचार-विनीमय करा....मंथन होऊ द्या आणि यातूनच समाजाला नवीन दिशा द्या!!

धन्यवाद !

लेवा हेडलाईनस